SBI: केवायसी अपडेट नसेल तर खाते होणार बंद, एसबीआय करणार हजारो बँक खाती बंद!

अनेकदा संधी देऊनही बँकेचे ग्राहक केवायसी संबंधित माहिती अद्ययावत करत नसल्याने एसबीआयने शेवटी कारवाईचा बडगा उगारण्याचे ठरविले आहे. आधारकार्ड आणि पॅनकार्डसंबंधित माहिती जमा न केल्याने एसबीआय हजारो बँक खाती बंद करणार आहे. तुमचेही केवायसी संबंधित कागदपत्रे जमा नसतील तर तातडीने हे काम नजकीच्या शाखेशी संपर्क साधून पूर्ण करुन घ्या अथवा एसएमएसद्वारे ही घरबसल्या तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करु शकता. 

SBI: केवायसी अपडेट नसेल तर खाते होणार बंद, एसबीआय करणार हजारो बँक खाती बंद!
केवायसी अपडेट
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 9:09 AM

तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल तर ही महत्वाची बातमी तुमच्यासाठीच. केवायसी अद्ययावत (KYC Update) नसल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांची हजारो बँक खाती बंद करणार आहे. स्टेट बँकेने केवायसी अपडेट करण्यासाठी यापूर्वी ही ग्राहकांना संधी दिली आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत ही मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानंतर कोरोना आणि त्यामुळे बँकेचे कामकाज प्रभावित झाल्याचे कारण यामुळे ही मुदत वाढ 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

सध्या तुमचे केवायसी अद्ययावत नसेल तर 31 मार्चपर्यंत तुमचे खाते सुरु राहिल. त्यानंतर मात्र खाते बंद करण्यात येईल. तुम्हाला बँक सातत्याने केवायसी अपडेट करण्यासाठी मॅसेज पाठवत असेल अथवा ई-मेलद्वारे यासंबंधीची माहिती देत असेल तर त्या सूचनेकडे दुर्लक्ष करु नका. कारण ग्राहकाच्या सुरक्षेसाठीच ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ग्राहकाने बँकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही तर, बँकेपुढे खाते बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.

स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, आधार कार्ड आणि पॅन देखील केवायसी अपडेटशी जोडले जावे. जर तुम्ही हे दोन्ही पेपर लिंक केले नसतील तर तुम्ही घरबसल्या मेसेजद्वारे आधार आणि पॅन लिंक करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे आणि देशातील सर्वात मोठी बँक  आहे. त्याच्या ग्राहकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. केवायसी अपडेट न केल्यामुळे त्याची हजारो खाती बंद होऊ शकतात, ज्याबद्दल एसबीआयने आधीच इशारा दिला आहे.

ग्राहकांना व्यवहार करता येणार नाही

स्टेट बँक ऑफ इंडियाने अनेक वेगवेगळ्या माध्यमातून केवायसी  अद्ययावत करण्यासंबंधीची माहिती दिली आहे. ग्राहकांना त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट व्यतिरिक्त, ग्राहकांच्या मोबाईलवर संदेश पाठवण्यात आले आहेत. एसबीआयच्या म्हणण्यानुसार, हजारो खाती अशी आहेत ज्यांना केवायसीसह अपडेट करणे आवश्यक आहे. ही मुदत 31 मार्च रोजी निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीपर्यंत तुम्ही खात्याचे केवायसी अपडेट करणं आवश्यक आहे, अन्यथा नंतर खात्यातून कोणताही व्यवहार होणार नाही. एटीएम किंवा डेबिट कार्डद्वारे ही ग्राहकाला व्यवहार करता येणार नाही.

आधार-पॅन करा लिंक

पॅन आणि आधार कार्ड लिंक करणे महत्वाचे आहे. एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना ही दोन आवश्यक कागदपत्रे 31 मार्चपर्यंत लिंक करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास 1 एप्रिलपासून बँक सेवेचा लाभ बंद होणार आहे. खात्यावरील व्यवहारांशी संबंधित सर्व सेवा बंद करण्यात येणार आहेत.  एसबीआयने मध्य प्रदेशातील रतलाम आणि झाबुआ जिल्ह्यातील 19,800 ग्राहकांना मेसेज पाठवून आधार आणि पॅन लवकर लिंक करण्यास सांगितले आहे. विनाअडथळा बँकिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी हे आवश्यक आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांनी पॅनला आधारशी लिंक केलं नाही तर  बँकेच्या कोणत्याही सेवेचा लाभ घेता येणार नाही.

असे जोडा पॅनकार्ड आधारशी  

https://incometaxindiaefiling.gov.in/ या पोर्टलवर जाऊन तुमची नाव नोंदणी करा

यापूर्वीच नोंदणी असेल तर तुमचा युजर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख टाकून लॉग-इन करा

आता एक पॉप-अप विंडो दिसेल, जी पॅनकार्ड आधारशी जोडण्यास सांगेल. मेन्यू बारवर प्रोफाईल सेटिंग्जवर जाऊन ‘लिंक बेस’वर क्लिक करा

पॅन कार्डवरील नाव, जन्मतारीख आणि लिंग यासारख्या तपशीलाची माहिती जवळ ठेवा

स्क्रीनवर लिहिलेले पॅन तपशील व्हेरिफाय करा.

तपशील जुळल्यास आपला आधार क्रमांक नोंदवा आणि “लिंक नाऊ” बटणावर क्लिक करा.

एक पॉप-अप संदेश  आला असेल. तुमचे आधार कार्ड पॅनकार्डशी  यशस्वीरित्या जोडला गेल्याची माहिती संदेशाद्वारे मिळेल.

संबंधित बातम्या : 

आता सरकारी कंपन्यांना करणार सोन्याहून पिवळे,  ‘या’ युक्तीने चमकणार सरकारी कंपन्याचे शेअर्स

Cryptocurrency Prices: शेअर बाजार कोमात, तरिही बिटकॉईन जोमात! कोणकोणत्या कॉईनचा बाजार तेजीत? वाचा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.