AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 हजार गुंतवून सुरु करा ‘हा’ व्यवसाय, सरकारकडून मिळणार आर्थिक मदत; महिन्याला लाखो रुपये कमावण्याची संधी

Mushroom Farming | असाच एक व्यवसाय म्हणजे अळंबी किंवा मशरुमची शेती. मशरूम केवळ पौष्टिक आणि औषधी दृष्टिकोनातूनच नव्हे तर निर्यातीसाठी देखील महत्त्वाचे आहे. आतापर्यंत मशरुमच्या शेतीमधून अनेकांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. मशरूमला रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये मागणी असते.

50 हजार गुंतवून सुरु करा 'हा' व्यवसाय, सरकारकडून मिळणार आर्थिक मदत; महिन्याला लाखो रुपये कमावण्याची संधी
मशरुम शेती
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 12:03 PM
Share

मुंबई: तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही प्रत्यक्ष शेती किंवा शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायात नशीब आजमवायला हरकत नाही. कारण, अलीकडच्या काळात पारंपारिक शेतमालाशिवाय आरोग्याच्यादृष्टीने अचानक महत्व प्राप्त झालेल्या पिकांची आणि उत्पादनांची मागणीही वाढली आहे.

असाच एक व्यवसाय म्हणजे अळंबी किंवा मशरुमची शेती. मशरूम केवळ पौष्टिक आणि औषधी दृष्टिकोनातूनच नव्हे तर निर्यातीसाठी देखील महत्त्वाचे आहे. आतापर्यंत मशरुमच्या शेतीमधून अनेकांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. मशरूमला रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये मागणी असते.

कशी कराल मशरुमची शेती?

जर तुम्हाला या व्यवसायातून कमाई करायची असेल तर तुम्हाला मशरूम लागवडीच्या तंत्राकडे लक्ष द्यावे लागेल. प्रति चौरस मीटर 10 किलो मशरूमचे सहज उत्पादन घेता येते. किमान 40 × 30 फूट जागेत तीन-तीन फूट रुंद रॅक बनवून मशरूम वाढवता येतात. तुम्ही सरकारी अनुदानाच्या मदतीने हा व्यवसाय सुरू करू शकता.

बटन, ऑयस्टर, भाताच्या पेंढय़ावर वाढणारी आणि दुधी, अळंबी अशा अळंबीचे व्यापारी तत्त्वावर उत्पन्न घेतले जाते. अळंबीसाठी वापरण्यात येणारा पेंढा शेतातील भातकापणी झाल्यानंतर उपलब्ध होतो व अळंबीचे उत्पन्न घेतल्यानंतर उरलेला चोथा हा खत म्हणून पुन्हा शेतात वापरता येतो. यामुळेच अळंबी लागवड हा शेतीला पूरक व्यवसाय आहे.

सर्व कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन केंद्रांमध्ये मशरूम लागवडीचे प्रशिक्षण दिले जाते. जर तुम्ही त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचा विचार करत असाल तर एकदा ते योग्यरित्या प्रशिक्षित करणे चांगले.

किती कमाई होईल?

जर तुम्ही प्रगत तंत्रज्ञानाने त्याची सुरुवात केलीत तर तुम्हाला सुरुवातीपासूनच लाखोंची कमाई करा येईल. जर तुम्ही ते 100 चौरस फूट क्षेत्रामध्ये अळंबीची शेती सुरु केली तर वर्षाला तुम्हाला 1 लाख ते 5 लाख रुपयांचा नफा मिळेल.

बाजारपेठेत मशरुमला मोठी मागणी

मशरुमचे बटन आणि शिंपला\धिंगरी मशरुम असे दोन प्रकार असतात. धिंगरी मशरुमची लागवड बटन मशरुमपेक्षा कमी खार्चिक आहे. मशरुम हे पचनक्रियेसाठी चांगेल असून त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही असतात. त्यामुळे अलीकडच्या काळात मशरुमपासून लोणची, पापड, सूप, हेल्थ पावडर, कॅप्सूल आणि हेल्थ ड्रिंक इत्याही उत्पादने बनवण्याचे प्रमाण वाढले आहे. घाऊक बाजारात मशरुमला प्रतिकिलो 50 ते 100 रुपये इतका भाव आहे. भारतातील अनेक शहरांमधून मशरुम परदेशातही निर्यात केले जाते.

उन्हाळ्यात मिल्की मशरुमची शेती करा अन् दहापट पैसा कमवा

मशरुमचे हजारो प्रकार असले तरी खाण्यासाठी काही मोजकेच योग्य आहेत. वेगवेगळ्या राज्यांत तेथील हवामानानुसार मशरूमचे काही प्रकार उत्पादनासाठी उत्तम मानले जातात. बिहाराबद्दल चर्चा करायची झाल्यास तेथे ऑयस्टर मशरूम, बटण मशरूम आणि मिल्की मशरूमची लागवड चांगली होते. ऑयस्टर मशरूमची लागवड मार्च व एप्रिलनंतर होत नाही.

उन्हाळ्याच्या काळात मिल्की मशरूमची लागवड सहज करता येते. जर आपण व्यावसायिकदृष्ट्या मशरूमची लागवड केली तर आपण या शेतीतून चांगली कमाईदेखील करू शकतो. मिल्की मशरूमला कॅलोसाइबी इंडिकादेखील म्हटले जाते. या मशरूमसाठी 28 ते 38 अंश डिग्री सेल्सिअस तापमान तसेच 80 ते 90 टक्क्यांपर्यंत आर्द्रता असावी लागते. अधिक तापमानातदेखील या मशरूमचे चांगले उत्पादन होते.

संबंधित बातम्या:

पाच रुपयांच्या समभागाची किंमत झाली 42 रुपये, सहा महिन्यांत 700 टक्के रिटर्न्स, गुंतवणूकदार मालामाल

राकेश झुनझुनवालांनी ‘या’ दोन कंपन्यांच्या समभागावर वर्षभरात मिळवले 216 टक्के रिटर्न्स

तमालपत्राची शेती सुरु करा, काही वर्षांमध्ये व्हाल मालामाल, जाणून घ्या सर्वकाही

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.