LIC Policy : बंद होत आहे ही जोरदार परतावा देणारी योजना, तुम्ही गुंतवणूक केली का?

LIC Policy : एलआयसीच्या या योजनेत जोरदार परतावा मिळतो. गुंतवणूकदारांना आतापर्यंत चांगला फायदा झाला आहे. ही योजना लवकरच बंद होत आहे. तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली आहे का?

LIC Policy : बंद होत आहे ही जोरदार परतावा देणारी योजना, तुम्ही गुंतवणूक केली का?
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 10:47 PM

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) भारतीय विमा क्षेत्रातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी विमा कंपनी आहे. ही कंपनी ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या अनुरुप विविध विमा पॉलिसी देते. एलआयसीचे अध्यक्ष एम आर कुमार यांनी नुकतीच एक योजना बंद करण्याची घोषणा केली आहे. एलआयसी त्यांची लोकप्रिय योजना धन वर्षा योजना (LIC Dhan Varsha Scheme) बंद करणार आहे. याविषयीची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेतील ग्राहकांना यापूर्वीच योजनेचा फायदा मिळालाआहे. 31 मार्च, 2023 पर्यंत ही योजना उपलब्ध आहे. तोपर्यंत गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येईल. त्यानंतर ही योजना बंद होईल. ज्यांना या योजनेत गुंतवणूक करायची आहे, त्यांनी आता घाई करणे आवश्यक आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने या योजनेत त्यांना गुंतवणूक करता येईल.

एलआयसी धन वर्षा योजना ही एक नॉन-लिंक, वैयक्तिक, बचत आणि एकल प्रीमियम विमा योजना आहे. ही योजना बचतीसोबत चांगला परतावा देते. पॉलिसीधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास या योजनेत वारसदारांना लाभ मिळतो.या योजनेत गुंतवणुकीचे दोन पर्याय उपलब्ध आहेत.या योजनेत वारंवार प्रिमियम भरण्याची कटकटही नाही.

या योजनेतंर्गत गुंतवणुकीचे दोन पर्याय समोर येतात. पहिल्या पर्यायामध्ये गुंतवणूकदारांना प्रिमियम रक्कमेच्या 1.25 पटीत रिटर्न मिळतात. यामध्ये नामनिर्देशीत व्यक्तीला 10 लाख रुपयांपर्यंतच्या एकल प्रीमियमवर 12.5 लाख रुपये मिळतात. दुसऱ्या पर्यायात गुंतवणूकदारांना प्रीमियम रक्कमेच्या दहा पटीत परतावा मिळतो. 10 लाख रुपयांच्या एकल प्रीमियमवर, गुंतवणूकदाराचा मृत्यू ओढावल्यास त्याच्या वारसदारांना 1 कोटी रुपयांचा परतावा मिळतो.

हे सुद्धा वाचा

विमाधारक योजनेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत जीवंत राहिल्यास तर त्याला मोठा फायदा मिळतो. मूळ विमा रक्कमेसोबत त्याला हमी दिलेले सर्व अनषांगिक लाभ मिळतात. हे गॅरेटिंड रिटर्न दरवर्षाच्या शेवटी जमा होतात. तसेच पॉलिसीच्या मॅच्युरिटीवरही लाभ मिळतात.

एलआयसी धन वर्षा योजना ही दहा अथाव पंधरा वर्षांसाठी घेता येते. पॉलिसी ऑनलाईन अथवा ऑफलाईन खरेदी करता येते. तीन वर्षांपासून ते 60 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती पॉलिसी खरेदी करु शकते. जेवढी रक्कम गुंतवाल, तेवढा जास्त फायदा होतो.

एखादी पॉलिसी व्यपगत (Lapsed) झाली असेल तर ती सुरु करता येईल. एलआयसीने त्यासाठी मोहिम सुरु केली आहे. 1 फेब्रवारी 2023 ते 24 मार्च 2023 या कालावधीत विलंब शुल्क भरुन ही पॉलिसी सुरु करता येते.

1 लाख रुपयांपर्यंतच्या प्रीमियमवर विलंब शुल्कावर 25 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. 3 लाख रुपयांच्या प्रीमियमवर 25 टक्क्यांची सूट मिळेल. तर 3 लाख आणि त्यापेक्षा अधिकच्या प्रीमियमवर 30 टक्के सूट मिळते. त्यानुसार दुहेरी फायदा होईल.

एलआयसी विम्याचे नुतनीकरण करण्यासाठी अट आणि नियमांचे पालन करावे लागेल. त्यानुसार अनपेड प्रीमियमची तारीख पाच वर्षांच्या आत नुतनीकरण करण्यात येईल. प्रीमियम भरताना आधुनिक तंत्राचा वापर केल्यास 5 रुपयांची विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे विलंब शुल्क भरताना त्याचा फायदा घेता येईल.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.