आधार कार्डचे ‘या’ पध्दतीने करा व्हेरिफिकेशन; UIDAI ची महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या

UIDAI कडून सांगण्यात आलेय, की कोणत्याही व्यक्तीबाबत माहिती मिळविण्यासाठी तसेच त्याची ओळख सत्यापित करण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन ही एक महत्वपूर्ण प्रक्रिया आहे.

आधार कार्डचे ‘या’ पध्दतीने करा व्हेरिफिकेशन; UIDAI ची महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या
Image Credit source: TV9 Marathi
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 05, 2022 | 1:15 PM

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने (UIDAI) बुधवारी सांगितले, की देशातील नागरिक विविध पध्दतीने आपल्या आधारची (Aadhar Card) वैधता सहज व सोप्या पध्दतीने जाणून घेउ शकतात. आधारच्या वैधतेची माहिती मिळविण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. आधार कार्ड देणारी सरकारी एजंसी युआयडीएआयनुसार, ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पध्दतीने आधारची वैधता (Aadhar Verification) सहजपध्दतीने तपासता येउ शकते. युआयडीएने पुढे सांगितले, की आधार कार्डची वैधता व्हेरिफाय करण्यासाठी अनेकांना विविध अडचणी येत असतात. या लेखाच्या माध्यमातून याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

ऑनलाइन व्हेरिफिकेशन

युआयडीएआयने आधारच्या व्हेरिफिकेशनसाठी अनेक पर्यायांबाबत सांगितले आहे. त्याबाबत अधिकृत पध्दतीने प्रेस रिलीज करण्यात आली असून त्यात सांगितलेय, की ऑनलाइन माध्यमातून आधार कार्डधारकांचे वय, लिंग, राज्य आणि मोबाइलचे शेवटचे तीन अंकांबाबत https://myaadhar.uidai.gov.in/ वर जाउन सत्यापित केले जाउ शकते.

ऑफलाइन व्हेरिफिकेशन

ऑफलाइनच्या माध्यमातूनही आधार कार्डच्या क्यूआर कोडने माहिती सत्यापित केली जाउ शकते. आधारकार्डसोबत काहीही छेडछाड केलेली असली तरी क्यूआर कोडची माहिती सुरक्षीत मानली जाते. क्यूआर कोडचा प्ले स्टोर आणि ॲप स्टोअरवर उपलब्ध आधार क्यूआर स्कॅनर ॲपव्दारे चेक केली जाउ शकते.

या ठिकाणी होतो वापर

युआयडीएआयने सांगितले, की कोणत्याही कर्मचार्यांना नियुक्त करताना, घरी नोकराला कामाला ठेवताना, ड्रायव्हरला नोकरी देताना, घर भाड्याने देताना त्यांच्या आधारचे व्हेरिफिकेशन केले जात असते. याशिवाय नागरिक विविध शासकीय कामांना तसेच ओळखपत्राच्या ठिकाणीही आधारचे व्हेरिफिकेशन करु शकतात.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें