देशभरातील युपीआय व्यवहारांना तांत्रिक ब्रेक; व्यवहार एक तासांहून अधिक काळ ठप्प वापरकर्त्यांना सर्व्हर डाऊनचा फटका

एकात्मिक भरणा पद्धती अर्थात युपीआय पेमेंट पद्धतीला रविवारी भला मोठा तांत्रिक अडथळा आला. सर्व्हर डाऊन झाल्याने देशभरातील व्यवहार ठप्प झाले होते.

देशभरातील युपीआय व्यवहारांना तांत्रिक ब्रेक; व्यवहार एक तासांहून अधिक काळ ठप्प वापरकर्त्यांना सर्व्हर डाऊनचा फटका
UPI
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 9:17 AM

मुंबई : एकात्मिक भरणा पद्धती अर्थात युपीआय पेमेंट (Unified Payment Interface) पद्धतीला रविवारी भला मोठा तांत्रिक अडथळा आला. सर्व्हर डाऊन (Server Down) झाल्याने देशभरातील व्यवहार ठप्प (Transaction Failed) झाले होते. त्यामुळे गोंधळाची स्थिती होती. एकतर रविवार असल्यामुळे लोकांची हॉटेल्स, रेस्टॉरंट, खाऊगल्ली, मॉल, बाजारात, पर्यटनस्थळी एकच भाऊगर्दी उसळली होती. त्यातच एक तासांहून अधिक काळ सर्व्हर डाऊन असल्याने या वापरकर्त्यांच्या (Users) उत्साहावर काही काळ विरजण पडले. बँक तळहाताएवढ्या मोबाईलमध्ये सामावलेली असल्याने खिश्यात जुजबी रक्कम ठेवली तरी काम भागत असल्याने नागरीक सहज विना रक्कम (without cash) बाहेर पडतात. पण सर्व्हर डाऊन झाल्याने काल त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. यंदा दुस-यांदा युपीआय पेमेंट सर्व्हर डाऊन होण्याचा वापरकर्त्याना सामना करावा लागाला आहे.

समाज माध्यमांवर तक्रारींचा पूर

वापरकर्त्यांच्या उत्साहावर, आनंदावर विरजण पडल्याने तसेच व्यवहार कशामुळे होत नाहीत, याचा थांगपत्ता लागत नसल्याने देशभरात पुरत्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर या समस्येची नागरिकांनी समाज माध्यमांवर माहिती द्यायला सुरुवात केली. कारणच कळत नसल्याने ट्विटर, फेसबूक, व्हाट्सअप, इन्स्टाग्रॅम या समाज माध्यमांवर लोकांनी त्यांच्या रागाला, गोंधाळाला वाट मोकळी करुन दिली. तक्रारींचा एकच पूर आल्याने याची चर्चा झाली. व्यवहार का पूर्ण होत नाहीत, काय समस्या आहेत हे विचारणारा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु झाला. वर्षातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 9 जानेवारी रोजी युपीआयचे सर्व्हर डाऊन झाले होते. एवढा गजहब माजलेला असतानाही या सर्व व्यवहारांचे परिचलन करणा-या, देखरेख करणा-या राष्ट्रीय देयके महामंडळाने (National Payment Transaction of India) अजून चक्कार शब्द काढलेला नाही. त्यांनी ही समस्या का उद्भवली, त्यामागची कारणे काय याचा साधा हिशेबही जनतेला दिला नाही.

एकात्मिक भरणा पद्धती अर्थात युपीआय पेमेंट हा राष्ट्रीय देयके महामंडळाचा उपक्रम असून वास्तविक वेळेत व्यवहार करण्याची ही प्रणाली विकसीत होऊन गेल्या पाच वर्षात या व्यवहारांना लोकांनी डोक्यावर घेतले आहे. वेळेत, जलदरित्या व्यवहार होत असल्याने नागरिकांनी या युपीआय पेमेंट प्रणालीचा जलदरित्या स्वीकार केला आहे. भारतातील किरकोळ बाजारातील 60 टक्के व्यवहार युपीआय पेमेंट मार्फत केल्या जातात. तर 100 रुपयांहून कमी असलेल्या रक्कमेच्या व्यवहारात युपीआयचा वाटा 75 टक्के इतका आहे. एकट्या मार्च महिन्यात युपीआयमार्फत 540 कोटींचा व्यवहार पूर्ण करण्यात आला आहे. सर्व्हर डाऊनची समस्या सोडविण्यासाठी आणि बँक, तसेच एकाचवेळी अनेक व्यवहारांमुळे सर्व्हर डाऊन होण्याच्या समस्यांना सारखे तोंड द्यावे लागत असल्याने राष्ट्रीय देयके महामंडळाने व्यवहार ऑफलाईन पद्धतीने करण्याच्या प्रयत्नांना बळकटी देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. लवकरच ही प्रणाली विकसीत होईल आणि सर्व्हर डाऊन झाल्यामुळे व्यवहार रद्द होण्याच्या समस्येवर मात करता येईल.

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | लग्नासाठी मुली बघताय ? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा

‘पितृदोष’ आणि ‘वास्तुदोष’ दूर करण्यासाठी कापूर वापरून करा हे उपाय… सर्व त्रास होतील दूर !

24-30 April 2022, साप्ताहिक राशिभविष्य : कन्या राशीसाठी कठीण असेल काळ, पहा इतर राशींसाठी संपूर्ण आठवडा कसा राहील..

Non Stop LIVE Update
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप.
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका.
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल.
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार.