Investment advice : काय आहे बँक पीएसयू फंड; पीएसयूमध्ये गुंतवणूक फायद्याची ठरू शकते? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

अजय देशपांडे

|

Updated on: May 12, 2022 | 5:30 AM

बँकिंग फंड हे ओपन-एंडेड डेट फंड आहेत, या फंडाद्वारे बँक, सार्वजनिक कंपन्या आणि संस्था, स्थानिक स्वराज संस्थांच्या कर्ज साधनांमध्ये 80 टक्के भांडवल गुंतवण्यात येते. याचा फायदा म्हणजे चांगला परतावा तर मिळतोच सोबत रिस्क कमी असते.

Investment advice : काय आहे बँक पीएसयू फंड; पीएसयूमध्ये गुंतवणूक फायद्याची ठरू शकते? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

नरेश पवार पेपर वाचत असताना बॉन्ड यील्ड (Bond yield) वाढल्याची बातमी त्यांना दिसली. 2023 च्या पहिल्या 6 महिन्यांत 10 वर्षांचे रोखे उत्पन्न 7 टक्के वाढेल असा अंदाज आर्थिक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. पवार संभ्रमात पडले. बॉन्ड यील्ड म्हणजे नेमके काय ? पवार यांच्याप्रमाणेच बहुतेक लोकांना बॉन्ड यील्डबद्दल आणि त्याचा परिणाम खिशावर कसा होतो? याची माहिती नसल्यानं समजून घेणं गरजेचं आहे. 2023 च्या पहिल्या 6 महिन्यांत 10 वर्षांचे रोखे (Bonds) उत्पन्न 7 टक्के वाढेल असा तज्त्रांचा अंदाज आहे. मुळात, जर बॉन्डचे यील्ड वाढले तर बॉन्डची किंमत घसरते. यामुळे डेट फंडाच्या नेट अ‍ॅसेट व्हॅल्यूमध्ये (Net asset value) देखील घसरण होते. डेट फंडाद्वारे मोठ्या प्रमाणात सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यात येते. परंतु जास्त परतावा मिळेल या आशेने उधारीची जोखीम म्हणजेच क्रेडिट रिक्स असलेल्या ठिकाणी पैसे गुंतवणूक करू नयेत, जास्त परतावा मिळेल म्हणून अशा ठिकाणी पैसे न लावण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो.

क्रेडिट रिस्क म्हणजे काय?

आता क्रेडिट रिस्क म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. एखादी बँक किंवा संस्थेला त्यांनी दिलेल्या कर्जाची परतफेड होत नसल्यानं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते, त्याला क्रेडिट रिस्क म्हणतात. कर्ज घेणारा कॉन्ट्रॅक्टचे पालन करत नाही. त्यामुळे कर्ज वसूल होत नसल्याने बँकेला मोठा आर्थिक फटका बसतो. बाजारातील चढ-उतारातही स्थिर राहून नुकसानीचं जोखीम कमी असावं हा उद्देश डेट फंडात असतो. त्यामुळे तुम्ही बँकिंग आणि सार्वजनिक क्षेत्रातील डेट फंडात गुंतवणूक केल्यास तुम्हाला स्थिर आणि सुरक्षित परतावा मिळतो. आत हे फंड नेमके कोणते ? असा प्रश्न पवारांना पडलाय

कमी जोखमीची गुंतवणूक

बँकिंग फंड हे ओपन-एंडेड डेट फंड आहेत, या फंडाद्वारे बँक, सार्वजनिक कंपन्या आणि संस्था, स्थानिक स्वराज संस्थांच्या कर्ज साधनांमध्ये 80 टक्के भांडवल गुंतवतात. बँक आणि PSU फंडांच्या पोर्टफोलिओमधील कर्ज साधनांना ट्रिपल A किंवा त्याहून अधिक रेटिंग असते. फंड व्यवस्थापक विशेषत: नवरत्न किंवा महारत्न कंपन्यांची सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या डेट साधनांमध्ये गुंतवणूक करतात. बँक आणि PSU फंड सार्वजनिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असल्यानं सुरक्षित असतात.त्यामुळे दिवाळखोरीचा धोका कमी असतो. म्हणूनच हा फंड जोखीम कमी घेणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे. स्थिर परतावा शोधणारे गुंतवणूकदारही त्यात गुंतवणूक करतात. कारण त्यात नियमित लाभांश असतो. बँक आणि PSU श्रेणीतील फंडांनी गेल्या 3 वर्षांत 6 ते 8 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. त्यामुळे,कुणाला कमी जोखीम घ्यायची असेल तर त्यांनी गुंतवणूक करावी, असा सल्ला तज्ज्ञाकडून देण्यात येत आहे. हे फंड मुदत ठेवींपेक्षा चांगला परतावा देतात.असे GCL सिक्युरिटीज लिमिटेडचे ​​उपाध्यक्ष, रवी सिंघल म्हणतात.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI