‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण’- अभिजीत दिपके
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गावातील शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचं अभिजीत दीपके यांनी म्हटलं आहे. शाळांमध्ये वीज, रस्ते आणि आवश्यक सुविधा असल्या पाहिजेत. यासाठी देशभरातील आपली टीम गावोगावी जाऊन सरपंच आणि ग्रामस्थांना सहभागी करून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘गावातील मुला-मुलींना शिक्षणासाठी पूर्ण संधी आणि सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत 80 वर्षांनंतरही आपण स्वातंत्र्याचं स्वप्न पूर्ण […]
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गावातील शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचं अभिजीत दीपके यांनी म्हटलं आहे. शाळांमध्ये वीज, रस्ते आणि आवश्यक सुविधा असल्या पाहिजेत. यासाठी देशभरातील आपली टीम गावोगावी जाऊन सरपंच आणि ग्रामस्थांना सहभागी करून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘गावातील मुला-मुलींना शिक्षणासाठी पूर्ण संधी आणि सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत 80 वर्षांनंतरही आपण स्वातंत्र्याचं स्वप्न पूर्ण करू शकलो नाही,’ अशी भूमिका दीपके यांनी मांडली. देश पूर्णपणे आणि गावापर्यंत शिक्षित झाल्याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, हैदराबादमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतलेल्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. विरोध करणाऱ्यांचं करिअर संपवण्याची मानसिकता म्हणजे हुकूमशाही वृत्ती असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच CJP बैठकीसाठी दिल्लीमध्ये हॉल मिळवताना दबाव आणि धमक्यांचा सामना करावा लागल्याचा दावाही त्यांनी केला.
