मोठी खळबळ! अभिजीत दिपकेला एअरपोर्टवरच.. वकिल असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
अलीकडेच नावारुपास आलेल्या अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने नीट प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला. या प्रकरणामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत विद्यार्थ्यांना, पालकांना आणि या प्रकरणामुळे नाराज असलेल्या नागरिकांना दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलनासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ‘मला एअरपोर्टवर भेटा, आपण सर्व मिळून आवाज उठवू,’ असं ते व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.
यावर आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान वकील असीम सरोदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सरोदे म्हणाले, ‘दीपकेने अनेकांना कॉल केले, मलासुद्धा फोन करून संवाद साधला. त्याने अमेरिकेतून कॉल करत ६ तारखेच्या आंदोलनाबाबत सांगितले. यामध्ये माझे असे मत होते की, आता हे वातावरण भारतात येण्यासारखे आहे का हे पाहावे.’ त्याशिवाय त्यांनी सांगितले की, कदाचित अभिजीत दीपके यांना विमानतळावरून अटक होऊ शकते. त्यांच्या या वक्तव्याने सध्या खळबळ उडाली आहे. यानंतर त्यांनी सांगितले की, त्याला अटक केली तर त्याला आणखी पाठिंबा मिळू शकतो, त्यामुळे कदाचित सरकार ते करणार नाही.