Abhijeet Dipke | हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले; नेमकं काय घडलं?
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याला भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलीस योग्य वागणूक देत नसल्याचा आरोप करत दीपके यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला जाब विचारला.

यावेळी अभिजित दीपके यांनी संतप्त होत, “ही काय बोलायची पद्धत झाली? लोक मला भेटायला येतात आणि तुम्ही त्यांनाही अशा प्रकारे वागणूक देता?” असा सवाल केला. तसेच “मला कोण भेटणार आणि कोण नाही, हे मी ठरवणार. तुम्ही कोण ठरवणारे?” अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना सुनावले.
आपल्याला भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांशी अशा पद्धतीने बोललेले आपल्याला अजिबात आवडणार नाही, असेही दीपके यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अभिजित दीपके आणि संबंधित PSI अधिकाऱ्यामध्ये झालेल्या या शाब्दिक वादाची चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Aug 07, 2026 1:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us