अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत म्हणाले, रोज…
कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांना टायफॉइड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे याची माहिती दिली. जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान तब्येत बिघडल्याचे त्यांनी सांगितले.
कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांना टायफॉइड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे याची माहिती दिली. जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान तब्येत बिघडल्याचे त्यांनी सांगितले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना अंगदुखी आणि तापाचा त्रास होत आहे. आता शारिरीक त्रास होत असला तरी आंदोलन सुरुच राहणार आहे. सकाळ संध्याकाळ मी ट्रीटमेंट घेत आहे. दरम्यान, आज सरकार आणि CJP यांच्यात तिसऱ्या फेरीची बैठकही होणार आहे.
अभिजीत दिपके यांनी आजारपणातही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले की, “नीट पेपर लीकच्या विरोधातील आमचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पद सोडेपर्यंत आंदोलन सुरू राहील.” सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही, तर CJP अधिक कठोर भूमिका घेऊ शकते, असेही संघटनेने पुन्हा स्पष्ट केले आहे.
CJP चे कार्यकर्ते आशुतोष रांका यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबतची बैठक सकारात्मक झाली. मात्र, आमच्या मुख्य मागणीवर अद्याप उत्तर मिळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. कालच्या बैठकीत नुकसानभरपाई आणि कायदेशीर मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि तत्त्वतः सहमती झाली. आज आम्हाला त्याचा लेखी करार मिळेल, अशी अपेक्षा आहे.”
