Air India Plane Crash :  जिथं विमान कोसळलं, त्या इमारतीच्या आतला अन् बाहेरचा नवा VIDEO समोर, बघताच उडेल थरकाप

Air India Plane Crash : जिथं विमान कोसळलं, त्या इमारतीच्या आतला अन् बाहेरचा नवा VIDEO समोर, बघताच उडेल थरकाप

| Updated on: Jun 13, 2025 | 1:36 PM

अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणारे विमान गुरुवारी अचानक कोसळले. या भीषण अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, आज दुर्घटनास्थळाची मोदींनी पहाणी केली तर दुसरीकडे नवा व्हिडीओ समोर आला आहे.

अहमदाबाद विमान दुर्घटनेचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. विमान दुर्घटनास्थळाच्या इमारतीचा हा नवा व्हिडीओ आहे. ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या ठिकाणावरील त्या इमारतीच्या आतला आणि बाहेरचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. समोर आलेल्या या नव्या व्हिडीओमध्ये ज्या इमारतीवर विमान कोसळलं त्या इमारतीची अवस्था बघता तुमच्या लक्षात येऊ शकते की हा अपघात किती भीषण होता.

काल गुरूवारी दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबाद येथे अपघात झाला. हे विमान अहमदाबाद येथून लंडन येथे जाणार होतं. मात्र अहमदाबाद येथील विमानतळावरून विमानाचं टेकऑफ होताच अवघ्या काही क्षणात ते विमान अहमदाबाद येथील मेघानी निवासी परिसरात कोसळलं. या अपघातात तब्बल २६५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Published on: Jun 13, 2025 01:30 PM