Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात

Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात

| Updated on: Sep 09, 2026 | 2:28 PM

अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनावर तीव्र टीका केली आहे. जरांगे यांचे वर्तन मराठा समाजासाठी अत्यंत हानिकारक असून त्यांच्यामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले आहे, असा गंभीर आरोप बारस्कर यांनी केला. संविधानाने दिलेल्या अधिकाराने आपण सत्य बोलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अजय बारस्कर यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. “कुणीही मराठ्यांचे वाटोळे करू शकत नाही, कोणाची हिंमत नाही,” असे ठामपणे सांगतानाच, बारस्कर यांनी जरांगे पाटील यांच्या कृतींमुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप केला.

बारस्कर यांनी म्हटले की, जरांगे यांचे आंदोलन ही एक लबाडी असून, एका संस्कृत सुभाषितात वर्णन केल्याप्रमाणे त्यांचे वर्तन अनियंत्रित आणि समाजासाठी हानिकारक ठरत आहे. “जरांगे नावाचे माकड तोंडाला येईल ते बळ काही घाणेरडं बोलतय, यामुळे मराठा समाजाचे प्रचंड नुकसान झाले आहे,” असे ते म्हणाले. संविधानाने दिलेल्या भाषण स्वातंत्र्याच्या आधारावर आपण सत्य बोलत असल्याचे बारस्कर यांनी स्पष्ट केले. ईडब्ल्यूएस (EWS) आरक्षणासारख्या सरकारी निर्णयांचे त्यांनी कौतुक केले, परंतु आपण भाजप किंवा शिवसेनेचे समर्थक नसून त्यांचे विरोधक असल्याचेही नमूद केले. त्यांनी बावनकुळे यांच्यावरही गंभीर आरोप केले.

Published on: Sep 09, 2026 2:28 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us