tv9 Marathi Special Report | दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला आक्रमक पवित्रा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात घातपाताची शक्यता व्यक्त करणाऱ्या रोहित पवार यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम आणि आक्रमक शब्दांत उत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात कोणताही घातपात आढळल्यास संबंधितांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात घातपाताची शक्यता व्यक्त करणाऱ्या रोहित पवार यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम आणि आक्रमक शब्दांत उत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात कोणताही घातपात आढळल्यास संबंधितांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. “कोणाचा बाप असला तरी त्याला शोधून काढू. जर कोणी षडयंत्र करेल तर त्याला आम्ही सोडून न देता त्याचा मुडदाही आम्ही खणून काढू असा आक्रमक पवित्रा मुख्यमंत्र्यांनी घेतला दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी महाराष्ट्रात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. यावरून रोहित पवार यांनी कर्नाटकात झिरो एफआयआर नोंदवला आहे. मात्र, यावरही मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, अशा प्रकारे एफआयआर दाखल करण्याचा अधिकार कर्नाटकाला नाही आणि महाराष्ट्राची मानहानी करण्याच्या उद्देशाने राजकीय प्रेरणेने ही कारवाई करण्यात आली आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
