कॉंग्रेसमध्ये मोठं भगदड! शिंदेच्या पक्षातील इनकमिंग सुरुच, 10 नगरसेवाकांसह…
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपंचायतीत मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 10 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपंचायतीत मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 10 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे. या पक्षप्रवेशामुळे अकोला जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शीटाकळी नगरपंचायतीतील 4 काँग्रेसचे नगरसेवक, 2 अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तसेच 4 अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. मुंबईतील नंदनवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या पक्षप्रवेशासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी विशेष पुढाकार घेतल्याची माहिती समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. अकोल्यातील या घडामोडींमुळे महायुतीतील राजकीय समीकरणांमध्येही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
