Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले…

Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले…

| Updated on: Sep 13, 2026 | 5:49 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात एक महिना ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशभरात विविध विकासकामे आणि सेवा उपक्रम राबवले जाणार असून, एनडीए सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांची माहितीही जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात एक महिना ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशभरात विविध विकासकामे आणि सेवा उपक्रम राबवले जाणार असून, एनडीए सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांची माहितीही जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज, 13 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषद घेत या अभियानाची घोषणा केली. या अभियानाअंतर्गत एकूण 12 कलमी कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती शाह यांनी दिली.

या कार्यक्रमामध्ये रक्तदान, आभार, नमो सेवा, संगीत-नाट्यमय प्रस्तुती, अंगणवाडी सेवा, सेवा ज्योती कलश यात्रा, वाडनगर ते वाराणसी यात्रा, वाराणसी ते वाडनगर यात्रा आणि सेवा सेतू अभियान यांसह विविध उपक्रमांचा समावेश आहे. तसेच ब्लॉक आणि तालुका स्तरावर केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष अभियान राबवले जाणार आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेत अमित शाह यांनी समान नागरी कायद्याबाबतही महत्त्वाची घोषणा केली. भारतात 2029 सालापर्यंत समान नागरी कायदा लागू केला जाईल, असं शाह यांनी सांगितलं. त्यामुळे सेवा संकल्प अभियानासोबतच समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरही शाह यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

 

Published on: Sep 13, 2026 5:49 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us