ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला…’ ठाकरेंचा निशाणा नेमका कुणावर?

ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला…’ ठाकरेंचा निशाणा नेमका कुणावर?

| Updated on: Aug 01, 2026 | 1:12 PM

मनसेच्या विद्यार्थी सेनेचा मुंबईत मेळावा सुरू असून, या कार्यक्रमाला अमित ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. देश आणि राज्यातील परिस्थितीवर बोलताना अमित ठाकरे भाषणादरम्यान भावूक झाले. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका करत चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले. त्यांच्या भाषणातील काही वक्तव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन झाले होते. या आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांनी आंदोलकांबाबत वक्तव्य केले होते. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांचे फिंगर प्रिंट घेतले असून, आधार कार्डच्या माध्यमातून त्यांचा शोध घेऊन अटक केली जाईल, असे त्यांनी म्हटले होते.

यावर अमित ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. “हा सर्व डाटा चंपाच्या घरी पाठवा,” असे म्हणत त्यांनी त्यांना डिवचले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मेळाव्यात राजकीय चर्चेला चांगलेच उधाण आले.

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा संदर्भ देत अमित ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा दिला. “तरुणांनी दिल्लीतून राजीनामा आणलाय, यांना राज्यातूनच राजीनामा आणायला वेळ लागणार नाही,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची मेळाव्यात जोरदार चर्चा झाली. अमित ठाकरे यांच्या भावनिक भाषणामुळे मेळाव्यातील वातावरण काही काळ गंभीर झाले आणि उपस्थित कार्यकर्त्यांचे लक्ष त्यांच्या वक्तव्यांकडे होते.

Published on: Aug 01, 2026 1:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us