Amol Mitkari : त्याच्या मेंदूवर काहीतरी परिणाम झालाय; मिटकरींची लक्ष्मण हाकेंवर सणसणीत टीका

Amol Mitkari : त्याच्या मेंदूवर काहीतरी परिणाम झालाय; मिटकरींची लक्ष्मण हाकेंवर सणसणीत टीका

| Updated on: May 30, 2025 | 12:48 PM

Amol Mitkari Criticized Lakshman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर अजित पवारांच्या गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी हाकेंवर हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिलं आहे.

लक्ष्मण हाके ओबीसी नेता कधीपासून झाला? त्याच्या मेंदूवर काहीतरी परिणाम झाला आहे, असा पलटवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला लक्ष्मण हाके यांच्यावर केला आहे. अजित पवार हे गोचिडेसारखे अर्थ खात्याला चिटकून बसले आहेत. त्यांचं राजकारण सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता असं आहे. ते सामाजिकदृष्ट्या असंवेदनशील आहेत, अशी विखारी टीई. का ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली होती. त्यांच्या या टीकेला आज अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, जो माणूस स्वत: गाडी घेऊन आपल्याला भुलवतो आहे की मला जनतेने गाडी दिली, त्याच गाडीत बसूनच तो हवेत गेला आहे. त्याने गाडीचं पासिंग बदलून घ्यावं. त्याच्या मेंदूवर काहीतरी परिणाम झाला आहे. लक्ष्मण हाके ओबीसीचा नेता नाही, असं सडेतोड प्रत्युत्तर अमोल मिटकरी यांनी दिलं आहे.

Published on: May 30, 2025 12:47 PM