Amravati Case | अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण; 350 व्हिडीओ व्हायरल केल्याचा अनिल बोंडेंचा आरोप

Amravati Case | अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण; 350 व्हिडीओ व्हायरल केल्याचा अनिल बोंडेंचा आरोप

| Updated on: Apr 14, 2026 | 5:21 PM

अमरावतीमधील परतवाडा शहरात एका धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झाला असून, मोहम्मद अयाझ मोहम्मद तन्वीर या आरोपीवर अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने काही तरुणींचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते व्हायरल केल्याचा आरोप आहे.

अमरावतीमधील परतवाडा शहरात एका धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झाला असून, मोहम्मद अयाझ मोहम्मद तन्वीर या आरोपीवर अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने काही तरुणींचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते व्हायरल केल्याचा आरोप आहे. सुमारे 350 व्हिडिओ प्रसारित झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, हे व्हिडिओ आरोपीने आपल्या मित्रांना पाठवले आहेत का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात सुमारे 180 तरुणींचे शोषण झाल्याचा गंभीर आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. त्यामुळे या घटनेची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, आरोपीचा संबंध एमआयएम पक्षाशी असल्याचेही बोलले जात आहे. काही फोटो आणि व्हिडिओमध्ये तो एमआयएमचे शहराध्यक्ष माजी इरफान खान यांच्याकडून नियुक्तीपत्र स्वीकारताना दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या संदर्भात अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या घटनेनंतर भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासाबाबत माहिती घेतली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Published on: Apr 14, 2026 05:21 PM
Follow Us