मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं होतं; कुणाचा घणाघात?
देशात सर्वाधिक कामचोर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे झालेले आहेत. म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना दहा वेळा विचार केला पाहिजे. सूर्यावर थुकल्याने ती थुंकी आपल्या चेहऱ्यावरच पडते अशा प्रकारची परिस्थिती आहे, असं रवी राणा म्हणाले आहेत.
अमरावती : आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याचा उद्धव ठाकरेंना कोणताच नैतिक अधिकार नाही. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाच त्यांनी तो नैतिक अधिकार गमावला आहे. पाच वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. 5 वर्षात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला गतिमान काम केलं. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मातोश्रीमध्येच लपून बसले होते. मुख्यमंत्री असताना स्वतःच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरेंनी वाऱ्यावर सोडला होता, असं रवी राणा म्हणाले आहेत. रवी राणा अमरावतीत माध्यमांशी बोलत होते. तेव्हा त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसावरही भाष्य केलंय.
Published on: Apr 05, 2023 02:43 PM
