Ashok Kharat | रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वीच लक्ष घालून कारवाईचे आदेश दिले होते. त्यांनी पोलीस महासंचालकांशी चर्चा करून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कडक कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संबंधित व्हिडिओ क्लिप आणि इतर पुरावे तपासात समाविष्ट करण्यात आले आहेत.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वीच लक्ष घालून कारवाईचे आदेश दिले होते. त्यांनी पोलीस महासंचालकांशी चर्चा करून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कडक कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संबंधित व्हिडिओ क्लिप आणि इतर पुरावे तपासात समाविष्ट करण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून, संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रात अशा प्रकारचे प्रकार घडणे निंदनीय असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रुपाली चाकणकर यांची बाजू घेतली असून, या प्रकरणात त्यांचा कोणताही दोष नसल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
