tv9 Marathi Special Report | 39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?; दीपक केसरकर यांचे खळबळजनक विधान

tv9 Marathi Special Report | 39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?; दीपक केसरकर यांचे खळबळजनक विधान

| Updated on: Mar 30, 2026 | 10:46 AM

अशोक खरात प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात आरोप झाल्यानंतर माजी मंत्री दीपक केसरकर यांनी खळबळजनक विधान करत स्वतःवर होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. “अशोक खरातला 39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?” असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दीपक केसरकर यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अशोक खरातसोबत केसरकर यांचे फोटो समोर आल्यानंतर अंधारेंनी गंभीर आरोप करत प्रकरण अधिक तापवले आहे. अंधारेंनी सिन्नर एमआयडीसीमधील नामकर्ण आवारे या व्यक्तीसोबतचे केसरकर यांचे फोटोही दाखवले. आवारे हा एका पतसंस्थेच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करत असल्याची चर्चा असल्याचा दावा त्यांनी केला. यापूर्वी केसरकर यांच्यावर अशोक खरातसोबत पूजा केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना केसरकर यांनी “मला मुद्दाम टार्गेट केलं जात आहे,” असे म्हटले.
या सर्व घडामोडींमुळे अशोक खरात प्रकरण अधिकच चिघळले असून, अंधारे यांनी केलेल्या आरोपांना केसरकर कसे उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Mar 30, 2026 10:45 AM
Follow Us