Ashok Kharat | अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश
अशोक खरात प्रकरणात ईडीला मोठा पुरावा हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. छापेमारीत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेशी संबंधित दस्तऐवज जप्त झाल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान पुण्यातील प्रकाश पोफळे यांच्या घरातून सुमारे 42 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
अशोक खरात प्रकरणात ईडीला मोठा पुरावा हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. छापेमारीत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेशी संबंधित दस्तऐवज जप्त झाल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान पुण्यातील प्रकाश पोफळे यांच्या घरातून सुमारे 42 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. प्रकाश पोफळे हे अशोक खरात यांच्या चार्टर्ड अकाउंटंट (CA) चे वडील असल्याचे सांगितले जाते. तसेच, ईडीने अशोक खरात यांची तब्बल 2 कोटी 50 लाख रुपयांची रक्कम गोठवली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात नाशिक, पुणे आणि शिर्डी येथे एकूण 11 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. नाशिकमध्ये पाच ठिकाणी तर पुणे व शिर्डी परिसरातही शोधमोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मालमत्तांची आणि कागदपत्रांची सखोल तपासणी केल्याचे सांगण्यात येते.
सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक खरात याच्या ईशान्येश्वर मंदिर, नाशिक येथील कार्यालय तसेच शहरातील विविध ठिकाणी असलेल्या जमिनींचीही तपासणी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले असून तपास यंत्रणा पुढील चौकशी करत आहे.
