Trupati Desai | नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह; तृप्ती देसाईंच्या आरोपांनी राजकारण ढवळून निघाले

Trupati Desai | नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह; तृप्ती देसाईंच्या आरोपांनी राजकारण ढवळून निघाले

| Updated on: Mar 30, 2026 | 12:11 PM

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देसाई यांच्या म्हणण्यानुसार, गोऱ्हे या अनेक वर्षांपासून अशोक खरातला ओळखतात आणि कोरोनापूर्वी त्यांनी त्याची भेट घेतली होती. तसेच खरातने त्यांचे भविष्य सांगितल्याचाही दावा करण्यात आला आहे.

महिलांच्या लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात अनेक राजकीय नेते खरातच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची नावे चर्चेत आली असून, चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
दरम्यान, या प्रकरणात नवे वळण आले असून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देसाई यांच्या म्हणण्यानुसार, गोऱ्हे या अनेक वर्षांपासून अशोक खरातला ओळखतात आणि कोरोनापूर्वी त्यांनी त्याची भेट घेतली होती. तसेच खरातने त्यांचे भविष्य सांगितल्याचाही दावा करण्यात आला आहे.
आमदारकीसाठी गोऱ्हे या खरातल्या भेटल्या असा आरोप देसाई यांनी केला आहे. कदाचित गोऱ्हे यांना खरातच्या काळ्या कारवायांची माहिती नसेल, पण आता अनेक महिलांनी खरातची गैरकृत्य सांगितल्यानंतर, गोऱ्हे यांनी खरातविरोधात आवाज का उठवला नाही?, आपल्या भेटीची माहिती त्यांनी का दिली नाही?, असा सवालही देसाई यांनी विचारला. मंत्रीपद मिळावं, ते भविष्य बघण्यासाठीसुद्धा कॉलेजरोडच्या खरातच्या ऑफीसमध्ये नीलम गोऱ्हे या पोहोचलेल्या होत्या, असा दावा देसाई यांनी केला आहे.

Published on: Mar 30, 2026 11:35 AM
Follow Us