Trupti Desai UNCUT | 150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर तृप्ती देसाईंचा थेट सवाल
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप करत अनेक सवाल केले आहेत. देसाई यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनापूर्वी नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये गोऱ्हे मुक्कामाला असताना अशोक खरात त्यांना भेटण्यासाठी गेला होता आणि त्याने त्यांचे भविष्यही सांगितले होते.
महिलांच्या लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरण वाढत असून, राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटी खरातच्या संपर्कात होते, अशी माहिती याआधी समोर आली होती.
दरम्यान, या प्रकरणात नवे वळण देत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप करत अनेक सवाल केले आहेत. देसाई यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनापूर्वी नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये गोऱ्हे मुक्कामाला असताना अशोक खरात त्यांना भेटण्यासाठी गेला होता आणि त्याने त्यांचे भविष्यही सांगितले होते. देसाई यांनी पुढे नमूद केले की, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले, मात्र विशेषतः नीलम गोऱ्हे यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. अगदी छोटे प्रकरण असले तरी त्याबद्दल प्रेस नोट काढणं, त्यावर जाहीरपणे त्या बोलत असतात. पण आता अख्खं अधिवशेन झालं, तिथे त्या उपसभापती म्हणून आहेत. महिलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा आला की नीलमताई या पीडितेला भेटायला जातात. पण इथे 150 हून अधिक व्हिडीओ पोलिसांकडे आले, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली, तेजस्वीनी सातपुते या महिला अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. तरीही एक महिला नेत्या म्हणून, जबाबदारीचं पद असणाऱ्या नीलम गोऱ्हे विधानपरिषदेच्या उपसभापती आहे, या खरात प्रकरणात नीलम गोऱ्हे आत्तापर्यंत काहीच बोलल्या नाहीत, असं का? असा सवाल तृप्तची देसाई यांनी विचारला.
