Ashok Kharat । अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समोर

Ashok Kharat । अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समोर

| Updated on: Apr 05, 2026 | 2:34 PM

भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. खरातचे एकामागून एक कारनामे समोर येत असतानाच यामध्ये आता थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नावही समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातनं अनेक व्यवसायिक तसेच गृहस्थांनाही गंडवलं होतं. अलीकडेच त्याचा बँकेसंबंधी नवा करारनामा उघड झाला आहे. यामुळे अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसून येतंय.

भोंदूबाबा अशोक खरातचं बँकेत एक दोन नाही तर 100 पेक्षा जास्त खात्यांवर नॉमिनी म्हणून नाव आहे. अनेकांचे आधार कार्ड, पेन कार्ड घेऊन तो स्वत:च कोट्यावधींचे व्यवहार करायचा. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये त्याचं एक खात रुपाली चाकरणरांच्या बहिणिच्या नावावरही आहे. अनेकांच्या खात्याचे नंबरही त्याच्याकडे होते. अशोक खरातच्या एकामागून एक उघड होणाऱ्या कारनाम्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे. रुपाली चाकणकरांचं नाव या प्रकरणात प्रामुख्याने घेतलं जात आहे करण चाकणकरांचे खरातसोबतचे अनेक फोटो व्हायरल होतं असून त्या खरातच्या संस्थेचाही भाग होत्या.

Published on: Apr 02, 2026 03:24 PM
Follow Us