Trupti Desai | नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय? ते दोन्ही कार्यकर्ते…

Trupti Desai | नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय? ते दोन्ही कार्यकर्ते…

| Updated on: Apr 03, 2026 | 2:12 PM

नाशिकचा ज्योतिष विद्या अवगत असल्याचा दावा करणारा भोंदू अशोक खरात सध्या कारागृहात आहे. त्याच्यावर महिला अत्याचार, लैंगिक शोषण, फसवणूक आणि पैसे लुबाडण्याचे अनेक आरोप आहेत. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.

नाशिकचा ज्योतिष विद्या अवगत असल्याचा दावा करणारा भोंदू अशोक खरात सध्या कारागृहात आहे. त्याच्यावर महिला अत्याचार, लैंगिक शोषण, फसवणूक आणि पैसे लुबाडण्याचे अनेक आरोप आहेत. भोंदू अशोक खरातला भेटायला अनेक नेते, राजकारणी आणि आमदार येत असल्याचेही समजते.
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. देसाईंच्या मते, गोऱ्हे कोरोना काळाच्या आधीपासून नाशिकमधील हॉटेलात खरातशी भेटत होत्या आणि मंत्रीपदासाठी त्यांना समर्थनही दिले. मात्र गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत हे सर्व आरोप फेटाळून लावले, त्यांनी खरातला कधीही भेट दिली नसल्याचे सांगितले. तरीही तृप्ती देसाई यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचा पुनरुच्चार केला. त्यांनी सांगितले की, खरातप्रकरणी माहिती दिलेली दोन व्यक्ती एक नाशिकची आणि दुसरी पुण्याची असून, ती माहिती एसआयटी किंवा पक्ष नेते एकनाथ शिंदे यांच्या समोर सादर होईल. योग्य वेळ आली की सर्व पुरावे समोर येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Apr 03, 2026 02:12 PM
Follow Us