Ashok Kharat | अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन… अंजली दमानिया करणार गौप्यस्फोट

Ashok Kharat | अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन… अंजली दमानिया करणार गौप्यस्फोट

| Updated on: Apr 13, 2026 | 6:49 PM

सध्या अशोक खरातच्या फसवणूक आणि भोंदूगिरी प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. अलीकडेच त्याचं ठाणे कनेक्शन उघड झालं आहे. यामध्ये अजित पवरांच्या अपघाताचादेखील संबंध असल्याचं सांगितलं जात आहे.

सध्या अशोक खरातच्या फसवणूक आणि भोंदूगिरी प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. अशोक खरातने अनेक महिलांवर अत्याचार केला इतकेच नाही तर व्यापाऱ्यांनाही गंडवलं. अनेक बड्या लोकांशी मिळून त्याने शेतकऱ्यांच्या जमीनदेखील गंडवून खरेदी केल्याचाही आरोप आहे.  अलीकडेच त्याचं ठाणे कनेक्शन उघड झालं आहे. यामध्ये अजित पवरांच्या अपघाताचादेखील संबंध असल्याचं सांगितलं जात आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया याबाबतीत बुधवारी पत्रकार परिषद घेणार असून अनेक गौप्य़स्फोट करणार आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 1800 पेक्षा जास्त फोन कॉल सर्वासमोर आणणार असून हे फोन मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे पोलिसांचेही आहेत. येत्या पत्रकार परिषदेत त्या अजित पवार अपघात आणि अशोक खरातचं ठाणे कनेक्शन पुराव्यांसह उघड करणार आहेत.

Published on: Apr 13, 2026 06:49 PM
Follow Us