VIDEO : Ganesh Chaturthi 2021 | मंत्री नारायण राणे, काँग्रेसचे भाई जगताप यांच्या घरी बाप्पा विराजमान

VIDEO : Ganesh Chaturthi 2021 | मंत्री नारायण राणे, काँग्रेसचे भाई जगताप यांच्या घरी बाप्पा विराजमान

| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 1:10 PM

मोरया रे बाप्पा मोरया रे… अशा घोषणा देत विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन झालं.यावेळी गणेश भक्तांनी कोरोना नियमांचं पालन करत उत्साहात गणरायाच्या मूर्तीची घरी आणि मंडपात प्रतिष्ठापना केली. तसेच मंत्री नारायण राणे, काँग्रेसचे भाई जगताप यांच्या घरी देखील बाप्पांचं विराजमान झालं आहे. 

ना ढोलताशांचा दणदणाट… ना गुलालांची उधळण… ना भव्यदिव्य मिरवणुका… मात्र, तरीही गणपती बाप्पा मोरया… मोरया रे बाप्पा मोरया रे… अशा घोषणा देत विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन झालं. राज्यभर रस्त्यांवरून गणेश मूर्त्या घेऊन जाताना गणेश भक्त दिसत होते. मात्र,  रस्त्यावर नेहमीसारखी गर्दी नसली तरी उत्साह मात्र कायम आहे. यावेळी गणेश भक्तांनी कोरोना नियमांचं पालन करत उत्साहात गणरायाच्या मूर्तीची घरी आणि मंडपात प्रतिष्ठापना केली. तसेच मंत्री नारायण राणे, काँग्रेसचे भाई जगताप यांच्या घरी देखील बाप्पांचं विराजमान झालं आहे.