मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई; 57 जण चौकशीच्या रडारवर, शहजाद भट्टी कनेक्शनने खळबळ
महाराष्ट्रातील गँगस्टर नेटवर्कविरोधात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठे ऑपरेशन सुरू केले असून, राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी मोहीम राबवण्यात येत आहे. मुंबई, मिरारोड, नालासोपारा, पुणे, नागपूर आणि नाशिक येथे ATS ची पथके सकाळपासून सक्रिय झाली असून, या कारवाईमुळे राज्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत तब्बल 57 जणांची चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे, कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात आलेल्या काही तरुणांची ATS कडून कसून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेल्या या छापेमारी आणि चौकशी सत्राचा वेग अजूनही कायम आहे.
दरम्यान, ATS कडून संशयितांच्या संपर्कांची, आर्थिक व्यवहारांची आणि गँगस्टर नेटवर्कशी असलेल्या संबंधांची सखोल तपासणी केली जात आहे. या कारवाईतून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.