
मुंबईचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करा; औरंगाबादच्या नामांतरावरून आक्रमक झालेल्या नेत्याची मागणी
एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. तसंच पुणे नागपूर, कोल्हापूर या शहरांचं नाव बदल्याचीही मागणी त्यांनी केलीय. पाहा...
मुंबई : औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. त्याला काहींनी विरोध केला. एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनीही याला कडाडून विरोध केला. आता मात्र इम्तियाज जलील यांनी मुंबईचं नाव बदलण्याची मागणी केली आहे.मुंबईचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर नागपूरचं नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर करा, असंही जलील म्हणालेत. मुंबई, पुणे नागपूर, कोल्हापूर या शहरांचं नाव बदल्याचीही मागणी त्यांनी केलीय.
Published on: Mar 01, 2023 8:37 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video