
कामाख्या देवीच्या दर्शनाला जातांना बच्चू कडूंचा उपरोधिक टोला
शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीत आहेत. एकनाथ शिंदेंसह काही आमदारांनी बुधवारी सकाळी तिथल्या कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीत आहेत. एकनाथ शिंदेंसह काही आमदारांनी बुधवारी सकाळी तिथल्या कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तिथं त्यांनी पूजासुद्धा केली. दर्शनाला जाताना बच्चू कडूंनी माध्यमांशी बोलताना शिवसेनेला उपरोधिक टोला लगावला. “जादूटोणा केलाय ना, म्हणून दर्शनाला चाललोय”, असं ते म्हणाले. एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसोबत उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी शक्तिपीठ असलेल्या कामाख्या देवीचं दर्शन घेऊन पूजा केली. कामाख्या देवीचं हे मंदिर भारतातल्या सर्वांत जुन्या मंदिरांपैकी एक आहे. काली आणि त्रिपुरसुंदरीनंतर कामाख्या देवी ही तांत्रिकांसाठी म्हणजे काळी जादू करणाऱ्यांसाठी महत्त्वाचं दैवत आहे असं मानलं जातं.
Published on: Jun 29, 2022 1:14 PM
Related Video
फिजिकल रिलेशनमुळे गौरव खन्नाचा मोडतोय 10 वर्षांचा संसार?
मराठी माणूस PMव्हावा गद्दार सोडून; फडणवीसांना संघाचाही पाठिंबा-ठाकरे
कॉमेडियन समय रैना प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट! दोघांचे फोटो व्हायरल
VIDEO : भयंकर! गगनचुंबी इमारतीत एसीचा ब्लास्ट, आग लागताच...
भीमराव कांबळेला शिक्षा सुनावणीआधी सरकारी वकिलांकडून महत्वाची अपडेट
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!