शब्दाचा पक्का माणूस असा…’ विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान बच्चू कडूंचं मोठं विधान

शब्दाचा पक्का माणूस असा…’ विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान बच्चू कडूंचं मोठं विधान

| Updated on: Apr 29, 2026 | 12:56 PM

विधानपरिषदेवर कोणत्या पक्षातून कोण जाईल या चर्चांनी सध्या राजकारण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेतली.

विधानपरिषदेवर कोणत्या पक्षातून कोण जाईल या चर्चांनी सध्या राजकारण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी काही नावे समोर आली आहेत. यापैकी एक नाव बच्चू कडू आहे, तर दुसरे नाव नीलम गोऱ्हे यांचे आहे. नुकतीच बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘मला जागा मिळणार हे मलाही माध्यमांवरूनच कळलं. त्यामुळे जर पद मिळालं तर ती तुमचीच कृपा आहे असं म्हणता येईल. मात्र अजून काही चर्चा व्हायची आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांची माझ्या कर्जमाफीच्या लढाईमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. त्यांना शब्दाचा पक्का माणूस म्हणता येईल असं ते व्यक्तिमत्त्व आहेत.’

पुढे बच्चू कडू म्हणाले, ‘पक्ष विलिनीकरणाबाबत चर्चेनंतरच ठरवणार. जर चर्चा झालीच तर आम्ही आमचे मुद्दे मांडणार.’

Published on: Apr 29, 2026 12:36 PM
Follow Us