Baramati Election 2026 | मोठी अपडेट! सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
राज्यातील बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांमध्ये बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू झाले आहे. या दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा मिळवण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये काल रात्री सविस्तर चर्चा झाली.
राज्यातील बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांमध्ये बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू झाले आहे. या दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा मिळवण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये काल रात्री सविस्तर चर्चा झाली. या चर्चेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. तसेच वंचित आघाडीचे नेते महादेव जानकर यांनीही काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी घेण्यात आल्या. बारामतीसाठी 6 तर राहुरीसाठी 4 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून शिवसेना ठाकरे गट तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतही चर्चा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून, निकाल 4 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
