Supriya Sule on Baramati Election | पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर, म्हणाल्या, अजितदादा आणि आम्ही काँग्रेसच्याच तालमीत…

Supriya Sule on Baramati Election | पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर, म्हणाल्या, अजितदादा आणि आम्ही काँग्रेसच्याच तालमीत…

| Updated on: Apr 07, 2026 | 12:39 PM

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. पार्थ पवार यांनी काँग्रेसविषयी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, “मी महाविकास आघाडीचे आभार मानते. विरोधी पक्षात भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना असली तरी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन चर्चा केली. प्रत्येकाने एकमेकांवर विश्वास दाखवला. आदरणीय पवार साहेब बिनविरोध निवडून आले, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. पार्थ पवार यांनी काँग्रेसविषयी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, “मी महाविकास आघाडीचे आभार मानते. विरोधी पक्षात भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना असली तरी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन चर्चा केली. प्रत्येकाने एकमेकांवर विश्वास दाखवला. आदरणीय पवार साहेब बिनविरोध निवडून आले, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा हा वारसा आहे. विरोधी पक्ष आपला शत्रू नसतो; मतभेद असले तरी मनभेद असू नयेत.”
सुप्रिया सुळे यांनी राज्यसभा निवडणुकीचे उदाहरण देत पुढे सांगितले की, “सर्व पक्षांनी समंजसपणा दाखवून निवडणूक सन्मानपूर्वक बिनविरोध झाली पाहिजे. काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु असल्याच्या पार्थ पवारांच्या विधानावर बोलताना सुळे म्हणाल्या, “काँग्रेस हा भारतातील एक मोठा पक्ष आहे. कुठलाही राजकीय पक्ष जर संविधानाच्या चौकटीत काम करत असेल तर त्यावर काहीही चुकीचे म्हणणे योग्य नाही. आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवतो.” सुळे यांनी ऐतिहासिक संदर्भ देत म्हटले, “आपल्या जन्माआधी इंग्रजांचे राज्य होते, आज आपण मोकळा श्वास घेतोय. यामागे काँग्रेसची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, हे कोणी विसरू शकत नाही. दादा असतील, पवारसाहेब असतील, आम्ही काँग्रेसच्या विचारांच्या तालमीत लहानाचे मोठे झालो.” सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यामुळे बारामतीतील राजकीय वातावरण आणि महाविकास आघाडीतील पक्षांमधील ऐक्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Published on: Apr 07, 2026 12:39 PM
Follow Us