tv9 Marathi Special Report | Jay Pawar | जय पवारांकडून स्वत:च्याच उमेदवारीचे संकेत; पवार विरुद्ध पवार चर्चेला उधाण
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडताच पवार कुटुंबातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विजयासह मोठ्या मताधिक्याची चर्चा रंगत असतानाच भविष्यातील राजकारणावरून नव्या चर्चांना उधाण आलं आहे. मतदान सुरू असतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी स्वतःच्या उमेदवारीचे संकेत दिले.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडताच पवार कुटुंबातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विजयासह मोठ्या मताधिक्याची चर्चा रंगत असतानाच भविष्यातील राजकारणावरून नव्या चर्चांना उधाण आलं आहे. मतदान सुरू असतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी स्वतःच्या उमेदवारीचे संकेत दिले. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत वक्तव्य केल्याने “पवार विरुद्ध पवार” अशी लढत पुन्हा पाहायला मिळणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
दरम्यान, मतदानाच्या दिवशी पवार कुटुंब एकत्र आल्याचं चित्र दिसलं असलं, तरी संध्याकाळपर्यंत जय पवार यांच्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. मतदान संपल्यानंतर जय पवार यांनी “पवार विरुद्ध पवार” अशी लढत होण्याची आपली इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जय पवार यांना “जबाबदारीने बोलावं” असा सल्ला देत अप्रत्यक्षपणे टोला लगावला. या सर्व घडामोडींमुळे बारामतीच्या राजकारणात पुढील काही वर्षांत नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
