Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनेलविरोधात युगेंद्र पवार स्वतंत्र पॅनल उभं करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

युगेंद्र पवार यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल देण्याची घोषणा केली आहे. शेतकरी सभासदांच्या प्रश्नांना प्राधान्य देत सक्षम पर्याय उभा करण्याच्या उद्देशाने आपण निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. युगेंद्र पवार लवकरच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू करणार असल्याचीही माहिती आहे.
दरम्यान, याआधी सुनेत्रा पवार यांनी भाऊकी-गावकीचे गट-तट बाजूला ठेवून एकजुटीने पुढे जाण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, आता युगेंद्र पवार यांनी स्वतंत्र पॅनलची घोषणा केल्याने सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत दोन वेगवेगळे गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीकडे बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंबातील राजकीय संघर्षाची छाया सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवर पडण्याची शक्यता असून, सोमेश्वर कारखान्याची निवडणूक ‘पवार विरुद्ध पवार’च्या नव्या राजकीय लढाईचं केंद्र ठरते का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.