Ashok Kharat Case | अशोक खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. जासूद यांच्या म्हणण्यानुसार, खरात भक्तांना ‘उतार पूजा’ आणि नागदेवतेचे दर्शन घडवण्याच्या बहाण्याने मंदिराच्या मागे नेत असे. तेथे तो भक्तांना हातात तांदूळ देत, “तांदूळ खाली पडले तर नागदेवता दंश करेल,” अशी भीती दाखवत असे. भीतीमुळे भक्त एका जागी स्थिर उभे राहत आणि हातातील तांदूळ सांभाळत. त्यानंतर खरात मंत्रोच्चार केल्याचा आव आणत रिमोटवर चालणारा नकली साप त्यांच्या समोर आणत असे. ही संपूर्ण घटना रात्रीच्या अंधारात घडत असल्याने भक्तांना स्पष्टपणे काही दिसत नसे. अशा प्रकारे भीती आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत खरात लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Published on: Mar 26, 2026 06:00 PM
Follow Us
