tv9 Marathi Special Report | भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण: प्रतिभा चाकणकरांची चौकशी, रुपाली चाकणकरांना नोटीस का नाही? विरोधक आक्रमक

tv9 Marathi Special Report | भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण: प्रतिभा चाकणकरांची चौकशी, रुपाली चाकणकरांना नोटीस का नाही? विरोधक आक्रमक

| Updated on: Apr 15, 2026 | 10:45 AM

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राजकीय वाद अधिक तीव्र होताना दिसत आहे. या प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांकडून तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. मात्र अद्याप रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी का बोलावण्यात आले नाही, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई आणि रुपाली ठोंबरे यांनी तपासाबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, तपास केवळ अशोक खरात यांच्या बाजूने सुरू असून काही राजकीय व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, समता पतसंस्थेच्या खात्यांशी संबंधित व्यवहारांबाबत प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांची चौकशी करण्यात आली. या खात्यांमधून सुमारे 4 कोटी 40 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या व्यवहारांमध्ये अशोक खरात हे नॉमिनी असल्याचेही सांगितले जात आहे.
या चारही खात्यांचा आपल्याशी कोणताही संबंध नसून ती खाती बनावट असल्याचा दावा प्रतिभा चाकणकर यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना तृप्ती देसाई यांनी वकिलांच्या सल्ल्यानुसार काहींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. सदर प्रकरणात तपास यंत्रणांवर निष्पक्षतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Apr 15, 2026 10:45 AM
Follow Us