Nitesh Rane : हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच… पत्रकारांना उत्तर देताना नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य

Nitesh Rane : हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच… पत्रकारांना उत्तर देताना नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य

Harshada Shinkar | Updated on: Apr 22, 2025 | 5:31 PM

सरकारकडून हिंदी सक्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर ही सक्ती मनसे खपवून घेणार नाही, असा इशाराच राज ठाकरेंनी दिला. यानंतर आज एक पत्रकार परिषद घेत असताना नितेश राणे म्हणाले हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेन, या मिश्कील वक्तव्याची सध्या चर्चा होतेय

राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात आता पहिलीपासून मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी इंग्रजीबरोबर आता हिंदी सक्तीची करण्यात आली आहे. दरम्यान, या हिंदी भाषा सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसताय. अशातच भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी एक मिश्कील वक्तव्य केल्याचे पाहायला मिळतंय. नितेश राणेंचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. हिंदी भाषेची सक्ती केली तर मी मरेन… असं वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे.

पत्रकारांना हिंदीतून उत्तर देताना नितेश राणे यांनी ही मिश्कील टिप्पणी केल्याचे पाहायला मिळाले. मत्स्यव्यवसायाला आता शेतीचा दर्जा दिला जाणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महत्वाचा निर्णय असून आता शेतीप्रमाणे मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. मत्स्य व्यवसायला कृषीचा दर्जा देण्यात येणारा हा निर्णय गेम चेंजर निर्णय आहे. यासंदर्भात माहिती देताना नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी हे मिश्कील वक्तव्य केलं आहे.

Published on: Apr 22, 2025 05:31 PM
Follow Us