‘राड्यामुळे शिवसेना पुढे आली, तो शेंबडा होता तेव्हा…’, नाव न घेता राणेंचा हल्लाबोल

‘राड्यामुळे शिवसेना पुढे आली, तो शेंबडा होता तेव्हा…’, नाव न घेता राणेंचा हल्लाबोल

Harshada Shinkar | Updated on: Aug 28, 2024 | 6:04 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. बघा काय केली सडकून टीका?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवरायाचा पुतळा कोसळला त्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी मविआचे नेते आज दाखल झाले होते. त्यावेळी महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आलेत. तर या झालेल्या राड्यानंतर भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. राजकोट येथील किल्ल्यावर आम्ही आमच्या जागेवर उभे होतो. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या रस्त्याने जावे, ही अपेक्षा होती. त्यांनीच या ठिकाणी गोंधळ केल्याचे म्हणत नारायण राणे यांनी आरोप केला. पुढे आदित्य ठाकरेंच्या टीकेवर बोलताना राणे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत काय केले. शरद पवार निवृत्तीनंतर काय करत आहे. ते चार वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रात मंत्री होते, तेव्हा मराठा आरक्षण देऊ शकले नाही. आता राजकारण करत आहेत. शिवसेना राड्यामुळेच ओळखली जाऊ लागली पुढे आली. शिवसेना उदयास कशी आली हे आदित्य ठाकरे यांना माहिती नाही, असे सांगत असताना नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंचा शेंबडा असा उल्लेख केला.

Published on: Aug 28, 2024 6:04 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us