Ameet Satam | पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; भाजप आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय

Ameet Satam | पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; भाजप आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय

| Updated on: May 18, 2026 | 4:39 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केल्यानंतर त्याचा प्रभाव आता विविध स्तरांवर दिसून येत आहे. भाजप आमदार अमित साटम यांच्या 12 वर्षीय कन्या माहीका साटम हिने देशहिताला प्राधान्य देत दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

माहीकाची दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली होती. अवघ्या १२ व्या वर्षी कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवत तिने मोठं यश संपादन केलं आहे. तिच्या मेहनतीमुळे तिला जागतिक स्तरावर खेळण्याची मोठी संधी मिळाली होती.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा आदर राखत साटम कुटुंबाने एकमताने स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आमदार अमित साटम यांनी सोशल मीडियाद्वारे दिली. त्यांच्या या निर्णयाचे अनेक स्तरांतून कौतुक केले जात असून देशहिताला प्राधान्य दिल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Published on: May 18, 2026 04:39 PM
Follow Us