आदित्य ठाकरे यांना एवढी घाई का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

आदित्य ठाकरे यांना एवढी घाई का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

| Updated on: Jan 21, 2023 | 10:14 AM

धनुष्य बाण हे चिन्ह कोणाचं हे निवडणूक आयोग ठरवेल आणि आयोग जो निर्णय देईल तो मान्य करावा, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान

धनुष्य बाण कोणाला मिळणार याचा निर्णय 30 जानेवारी रोजी निर्णय होणार असून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सर्वांनी विश्वास ठेवावा, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. जर निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात प्रकरण सुरू असताना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करत असेल तर निवडणूक आयोग ठरवेल आणि आयोग जो निर्णय देईल तो मान्य करावा. असे असताना आदित्य ठाकरे यांना एवढी घाई का? असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी सत्याचा विजय होईल असे म्हटले होते, त्यावरही बानवकुळे यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, १२ कोटी जनतेने सत्याचा विजय पाहिला आहे. तुमच्या रक्तात बेईमानी आहे आणि बेईमानी करत तुम्ही राज्य मिळवलं. पण खरं सत्य काय हे निवडणूक आयोगाचा निकाल आल्यावर स्पष्ट होईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तर निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत मी किंवा कोणीही घाई करून फायदा नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Jan 21, 2023 10:11 AM