tv9 Marathi Special Report | 1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना… ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस; भरारी पथकांची झाडाझडती सुरू
घरगुती गॅस सिलेंडरसाठी व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी काळा बाजार सुरु झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. 1 हजार 900 रुपयांचा व्यावसायिक सिलेंडर सध्या साडे चार हजार रुपयांना ब्लॅकमध्ये मिळत असल्याचा आरोप ठाण्यातील असोसिएशनने केला आहे.
घरगुती गॅस सिलेंडरसाठी व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी काळा बाजार सुरु झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. 1 हजार 900 रुपयांचा व्यावसायिक सिलेंडर सध्या साडे चार हजार रुपयांना ब्लॅकमध्ये मिळत असल्याचा आरोप ठाण्यातील असोसिएशनने केला आहे. काळा बाजार रोखण्यासाठी महाराष्ट्रभर अन्ननागरी पुरवठा विभागाने विशेष भरारी पथके तयार केली आहेत. त्यानुसार शहरांमध्ये विविध ठिकाणी छापेमारी सुरु झाली आहे. विभागाच्या निरीक्षणानुसार ब्लॅकमार्केटवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यातील तुटवडा आणि वाढत्या मागणीमुळे नागरिक आणि हॉटेल व्यवसायिक दोघांनाही त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने काळा बाजार रोखण्यासाठी आणि सिलेंडर वितरण सुरळीत करण्यासाठी पावले उचलली आहेत.
Published on: Mar 12, 2026 12:52 PM
Follow Us
