
Ambernath News : थरार! अंध व्यक्ती धावत्या लोकलसमोर रुळावर पडला, त्यानंतर जे घडलं ते..
रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने पाय घसरून एक अंध व्यक्ती रेल्वे रुळावर पडल्याची घटना घडली आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने पाय घसरून एक अंध व्यक्ती रेल्वे रुळावर पडल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंबरनाथ रेल्वे स्थानकावर मुंबई महापालिकेचे कर्मचारी असलेले सिद्धनाथ माने हे अंध असून संध्याकाळी ७च्या सुमारास अंबरनाथहून कर्जतला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत होते. लोकल आल्याची घोषणा झाली असता ते लोकल पकडण्यासाठी पुढे सरसावले. याचवेळी समोरून कर्जतकडे जाणारी लोकल देखील येत होती. मात्र माने यांना प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने ते थेट रेल्वे रुळावर कोसळले. यावेळी कर्तव्यावर असलेले सुरक्षा जवान अमोल देवरे यांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने त्यांनी लागलीच स्वत:च्या जिवाची पर्वा न करता रुळावर उडी घेत या अंध व्यक्तीचे प्राण वाचवले.
Published on: Jun 12, 2025 9:10 AM
Related Video
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
गोविंदावर सुनीताने गोळी झाडली होती? काय खरं? काय खोटं? काय सांगितलं?
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,