Sushma Andhare | एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का? सुषमा अंधारेंचा रोखठोक सवाल
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कॅप्टन अशोक खरात याला एका महिलेवरील बलात्कार प्रकरणात बुधवारी पहाटे पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या तपासात त्याच्याकडून एक पेनड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे. या पेनड्राइव्हमध्ये 58 अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. यामुळे प्रकरण आणखी गंभीर झाले आहे. शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर टीका केली.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कॅप्टन अशोक खरात याला एका महिलेवरील बलात्कार प्रकरणात बुधवारी पहाटे पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या तपासात त्याच्याकडून एक पेनड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे. या पेनड्राइव्हमध्ये 58 अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. यामुळे प्रकरण आणखी गंभीर झाले आहे. शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर टीका केली. त्यांनी खरातला “भोंदू बाबा” नव्हे तर “विकृत बाबा” म्हणून संबोधले. याच प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पूजा करतानाचा फोटो समोर आला आहे, शिंदे यांचा तिथे इंटरफेअर होता, अशीही गोष्ट पुढे येत आहे. दीपक केसरकर दर महिना-दीड महिन्याला या भोंदूबाबाकडे जात होते, असं पत्रकार दत्तात्रय खेमनार यांचं म्हणणं आहे. त्यांनी पुढे जाऊन अनेक खळबळजनक दावे केले आहेत. जे सो कॉल्ड पॉलिटिकल लोक आहेत, त्या सगळ्यांना तपासण्याची जबाबदारी ही गृहखात्याची आहे. एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का? असा रोखठोक सवाल अंधारे यांनी विचारला. कारण एकनाथ शिंदे हे ज्यांच्याकडे नेहमी जातात, त्या केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्यासबोत कॅप्टन खरातचा फोटो आहे, हे खूप महत्वाचं आहे. जयंत पाटील, नार्वेकरांचीही चौकशी करा. माझ्या पक्षााचा जरी कोणी यात अडकला तर त्याचीसुद्धा यात गय केली जाऊ नये, हा प्रश्न लेकीबाळींच्या इभ्रतीचा आहे, असं अंधारे यांनी सुनावलं. तसेच रुपाली चाकणकरांची अटक ही या प्रकरणात महत्त्वाची आहे असंही त्या म्हणाल्या.
