NEET प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं नवं कांड! त्या व्यक्तीचा नंबर थेट ‘God’ म्हणून सेव्ह, खळबळजनक माहिती समोर

NEET प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं नवं कांड! त्या व्यक्तीचा नंबर थेट ‘God’ म्हणून सेव्ह, खळबळजनक माहिती समोर

| Updated on: May 27, 2026 | 11:30 AM

नीट पेपरफुटी प्रकरणात CBI कडून मोठी कारवाई करण्यात आली असून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात CBI कडून मोठी कारवाई करण्यात आली असून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात ‘गॉड’ नावाने नंबर सेव असलेला तेजस शाह हा विद्यार्थी CBI च्या जाळ्यात अडकला आहे. पुण्यातून त्याला अटक करण्यात आली असून तपासादरम्यान त्याने मनीषा हवालदार हिच्याकडून नीटचा पेपर विकत घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता आणखी वेगाने पुढे जात आहे.

दरम्यान, डॉक्टर मनोज शिरूरे यांनाही CBI ने अटक केली आहे. मनोज शिरूरे यांनी देखील पेपर मिळवल्याचा संशय तपास यंत्रणेला होता. यापूर्वी पुणे आणि लातूर येथे त्यांची सखोल चौकशी करण्यात आली होती. चौकशीत काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्यानंतर CBI ने दोघांविरोधात कारवाई केली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली असून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे CBI कडून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

Published on: May 27, 2026 11:30 AM
Follow Us