25 लाखात चक्क 16 महिने… 20 वर्ष जुन्या दुहेरी हत्या प्रकरणाचा आज निकाल, बड्या नेत्यावर होता कट रचून हत्येची रेकी करण्याचा गंभीर आरोप
राज्याचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर नऊ आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल आज जाहीर होणार आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालय हा महत्त्वाचा निर्णय देणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या खटल्याकडे लागले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रभावशाली नेते पवनराजे निंबाळकर यांची 3 जून 2006 रोजी परंडा-कळंब रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात त्यांचे चालकही मृत्यूमुखी पडले होते. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.
सुरुवातीला या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडे होता. मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास नंतर Central Bureau of Investigation अर्थात सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली होती.
सीबीआयने 2009 मध्ये पद्मसिंह यांना अटक केली होती. ते आधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेते होते. नंतर त्यानी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. राजकीय वादातून 25 लाख घेऊन 16 महिने कट रचून हत्या करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता. गेली अनेक वर्षे या खटल्याची सुनावणी सुरू होती. आता अखेर न्यायालय काय निर्णय देते, याकडे निंबाळकर कुटुंबासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.