मोठी बातमी! 119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, 7 ठिकाणी छापेमारी, धक्कादायक माहिती समोर…
CBI ने दोन मोठ्या बँक फसवणूक प्रकरणांमध्ये मोठी कारवाई करत मुंबई आणि अहमदाबाद येथे 7 ठिकाणी छापेमारी केली आहे. या कारवाईत तब्बल 119.03 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. CBI ने 21 मे 2026 रोजी या कारवाया केल्या असून दोन वेगवेगळ्या कंपन्यांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

पहिले प्रकरण श्री हरी एक्सट्रुजन प्रायव्हेट लिमिटेड आणि जय फॉर्म्युलेशन्स लिमिटेड या कंपन्यांशी संबंधित आहे. या कंपन्यांच्या संचालकांच्या घरांवर आणि इतर ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. तपासादरम्यान काही महत्त्वाचे कागदपत्रे आणि पुरावे जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
CBI च्या माहितीनुसार, पंजाब नॅशनल बँकेची 61.98 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियालाही 57.05 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा आरोप आहे. कर्ज घेतल्यानंतर निधीचा चुकीचा वापर, खोटी आर्थिक कागदपत्रे आणि व्यवहारांमध्ये गैरप्रकार केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.