Marathi News Videos Chandrapur Tadoba Jungle Safari Tadoba Andhari Tiger Reserve is open for tourists from today

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, आजच ताडोबाच्या जंगल सफारीचं प्लानिंग करा, कारण….
ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून ते चंद्रपूर जिल्हयात आहे. याची स्थापना १९५५ साली जेव्हा तो मध्य प्रांताचा भाग होता, जेव्हा याची स्थापना झाली तेव्हापासून हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. उद्यानात आढळणाऱ्या मगरी-सुसरी आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे. याच ताडोबाची जंगल सफारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Chandrapur Tadoba Jungle Safari : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाळ्याचे तीन महिने म्हणजे 1 जुलै ते 30 सप्टेंबर ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा पर्यटनासाठी बंद असतो, या काळात ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अंतर्गत रस्ते पावसामुळे सफारीसाठी उपयुक्त नसल्याने आणि या काळात अनेक जीवजंतू, प्राणी आणि पक्षांचा प्रजनन काळ असल्यामुळे पर्यटकांसाठी सफारी बंद करण्यात येते. मात्र पावसाचा जोर उतरताच आजपासून पुन्हा एकदा ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांच्या सेवेत दाखल होत आहे. ताडोबात आजपासूनच पर्यटकांची रेलचेल सुरू होणार असल्यामुळे स्थानिक लोकांच्या रोजगाराला आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. अशातच आज ताडोबा सफारीसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर नागपुरात दाखल झाल्याची माहिती मिळतेय. बघा व्हिडीओ…
Published on: Oct 02, 2024 12:28 PM
मध्यरात्र, सुनसान रस्ता...अभिनेत्रीने केला कहर! मुंबई पोलीस लागले मागे
तुम्ही टीव्ही पाहताना किती अंतरावरुन पाहता? 32, 43, 55 इंचानुसार गणित
वेस्ट इंडिजने करून दाखवलं, ग्रीव्ह्सच्या खेळीने न्यूझीलंड बॅकफूटवर
महिलांमध्ये मोठ्या संख्येने वाढणारा 'हा' आजार बरा होऊ शकतो का?
भारताला बंपर लॉटरी, आता या बलाढ्य देशाकडून सर्वात मोठी घोषणा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
जालन्यात थंडीचा जोर अधिकच वाढला
भोरमध्ये शेतकऱ्यांची भात कापणी करून, भरडण्याची लगबग
जायचं होतं पुण्याला इंडिगोच्या विमानानं प्रवाशांना सोडलं हैदराबादला
लातूर येथे शिक्षकांचा टीईटी परीक्षेच्या विरोधात मोठा मोर्चा
नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमप्रकरणातू हत्या, आंचल आणि सक्षम ताटे यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण