मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण तरी काय?
राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील तीन बड्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. यानंतर लगेचच राष्ट्रवादीतील आणखी एका वरिष्ठ नेत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यात नसून थेट समोर आले आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अलीकडेच पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, इतकेच नाही तर या पाठोपाठ आणखी दोन राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांनी थेट वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्रीशी चर्चा केली. या भेटीनंतरच धनंजय मुंडे यांनीही भेट घेतल्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीचं कारण काहीसं वेगळं असल्याच दिसून आलं.
मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अशी माहिती समोर आली आहे. त्यांनी कांद्याच्या निर्यात आणि दरांबाबत सविस्तर चर्चा केल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे.